मित्रांनो, एक गोष्ट आधी स्पष्ट करतो. स्टेजची भीती वाटणं हा आजार नाही. ती तुमची कमजोरीही नाही. जवळजवळ प्रत्येक माणसाला पहिल्यांदा बोलताना भीती वाटते. युवराज सरांचेही तिसरीत पहिल्या भाषणावेळी पाय थरथरत होते.
फरक एवढाच असतो: काही लोक त्या भीतीमुळे बोलणंच सोडून देतात, आणि काही लोक भीती असतानाही बोलत राहतात. दुसऱ्या प्रकारच्या लोकांची भीती हळूहळू संपते.
स्टेजवर भीती का वाटते?
- "लोक काय म्हणतील?" हा विचार.
- बोलताना विसरलो तर? ही काळजी.
- सराव नसणं. पहिल्यांदाच इतक्या लोकांसमोर उभं राहणं.
- भाषणाची तयारी कशी करायची, सुरुवात कशी करायची, हेच माहीत नसणं.
यातलं बहुतेक सगळं सरावाने आणि योग्य पद्धतीने दूर होतं.
प्रशिक्षणात भीती कशी जाते?
1. पहिल्याच दिवशी स्टेजवर
कार्यशाळेत पोहोचल्यापासून बोलायला सुरुवात. सुरुवात अगदी छोटी: नाव, गाव आणि ध्येय. 30 सेकंद.
2. पुन्हा पुन्हा संधी
3 दिवसीय निवासी बेसिक कार्यशाळेत प्रत्येक सहभागी 12 ते 15 वेळा स्टेजवर बोलतो. एकदा बोलून भीती जात नाही. पण पंधराव्या वेळी तोच माणूस स्वतःहून हात वर करतो.
3. लहान गट, वैयक्तिक फीडबॅक
सहकारी ट्रेनर लहान गटांत सराव घेतात. चूक दाखवताना माणूस खचणार नाही, उलट पुढच्या वेळी अधिक चांगलं बोलेल, अशा पद्धतीने फीडबॅक दिला जातो.
4. भीतीवरच काम
भीती ओळखणं, तिचे प्रकार समजणं आणि उपाय करणं, हा अभ्यासक्रमाचाच भाग आहे. श्वास, आवाज, देहबोली आणि तयारीच्या पद्धती शिकवल्या जातात.
5. पायरी पायरीने वेळ वाढवणं
30 सेकंद, 1 मिनिट, 2 मिनिटं, 5 मिनिटं. Mastery Course मध्ये 60 मिनिटांपर्यंत.

आगामी बॅचेस (पक्क्या तारखा)
फी, राहण्याची सोय आणि उरलेल्या जागा WhatsApp किंवा फोनवर विचारा: 92208 60406 / 75176 05595.
आजपासूनच करा: 5 सोप्या कृती
- पहिली दोन वाक्यं पाठ करा. सुरुवात ठाम झाली की पुढचं भाषण आपोआप पुढे सरकतं.
- आरशासमोर रोज 1 मिनिट बोला. कोणताही विषय घ्या. चेहरा आणि हात कसे हलतात ते पाहा.
- बोलण्याआधी तीन वेळा खोल श्वास घ्या. श्वास शांत झाला की आवाज स्थिर होतो.
- मोबाईलवर रेकॉर्ड करा. स्वतःचं भाषण ऐकलं की सुधारणा स्वतःलाच दिसते.
- छोट्या संधी सोडू नका. घरच्या कार्यक्रमात, मीटिंगमध्ये, दोन वाक्यं तरी बोला.
Teach Less. Make Them Speak More. वाचून भीती जात नाही, बोलून जाते.
ज्यांची भीती गेली, त्यांच्याच शब्दांत
"स्टेजची भीती 3 दिवसांत कशी गेली?" हा लोणावळा निवासी कार्यशाळेतील सहभागीचा अनुभव, आणि इतर विद्यार्थ्यांचे व्हिडिओ यशोगाथा पानावर पाहा.
In English
Stage fear (glossophobia) is common and it reduces with structured practice. At Yuvraj Gaikwad Training Institute, participants start speaking on day one with a 30-second self-introduction, get small-group practice with personal feedback, and in the 3-day residential basic workshop each person speaks on stage 12 to 15 times. Training is in Marathi.
नेहमीचे प्रश्न
स्टेजची भीती खरंच जाते का?
हो. इथे लेक्चर कमी आणि प्रत्यक्ष बोलणं जास्त असतं. गेल्या 16+ वर्षांत 373+ बॅचेसमधून 12,000+ विद्यार्थ्यांनी हा बदल अनुभवला आहे.
मी खूपच घाबरतो, मला जमेल का?
कार्यशाळेत येणारे बहुतेक जण असेच विचार करून येतात. सुरुवात 30 सेकंदांच्या ओळखीपासून होते, म्हणून पहिली पायरी कोणालाही जमते.
भीती घालवण्यासाठी कोणता कोर्स?
सर्वात जलद बदलासाठी 3 दिवसीय निवासी बेसिक वक्ता कार्यशाळा (लोणावळा). रविवारी जमणार असेल तर 10 आठवड्यांचा वक्ता प्रशिक्षण कोर्स. घरबसल्या सुरुवात हवी असेल तर WhatsApp वरचा 5 दिवसांचा कोर्स.
कोर्स, तारखा आणि फी जाणून घ्यायला एक मेसेज पुरे.