पुण्यात किंवा पिंपरी चिंचवडमध्ये राहता, आणि चार लोकांसमोर बोलताना पाय थरथरतात? मीटिंगमध्ये मुद्दा माहीत असूनही तोंडातून शब्द फुटत नाहीत? मग हे पान तुमच्यासाठी आहे.
युवराज गायकवाड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं ऑफिस निगडीत आहे. इथे दर रविवारी वक्तृत्वाचे कोर्स होतात, आणि लोणावळ्यात निवासी कार्यशाळा होतात. संपूर्ण प्रशिक्षण मराठीत, गरजेनुसार रोजच्या वापरातल्या इंग्रजी शब्दांसह.

क्लास नेमका कुठे आहे?
पत्ता: 2nd Floor, ABC Properties, Crazy Cheesy Cafe च्या वर, संत ज्ञानेश्वर चौक (भेळ चौकाजवळ), Sector 25, निगडी, पिंपरी चिंचवड, पुणे 411044.
ओळखीची खूण: Crazy Cheesy Cafe च्या वर, संत ज्ञानेश्वर चौक, भेळ चौकाजवळ. Google Maps वर "Yuvraj Gaikwad Training Institute" शोधा, किंवा इथे क्लिक करून नकाशा उघडा.
पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या वेगवेगळ्या भागांतून, तसेच महाराष्ट्रभरातून विद्यार्थी इथे येतात. ज्यांना रोज येणं शक्य नाही, त्यांच्यासाठी रविवारचे कोर्स, निवासी कार्यशाळा आणि ऑनलाइन कोर्स आहेत.
कोणते कोर्स आहेत?
| कोर्स / कार्यशाळा | कालावधी | कोणासाठी |
|---|---|---|
| 1 दिवसीय वक्ता कार्यशाळा | 1 दिवस | सुरुवात करणाऱ्या सर्वांसाठी |
| 2 दिवसीय निवासी वक्ता कार्यशाळा | 2 दिवस, निवासी | दोन दिवस फक्त सराव हवा असणाऱ्यांसाठी |
| 3 दिवसीय निवासी बेसिक वक्ता कार्यशाळा | 3 दिवस, लोणावळा | स्टेजची भीती घालवायची आहे, 35 विषय |
| 3 दिवसीय निवासी ॲडव्हान्स वक्ता कार्यशाळा | 3 दिवस, फक्त 10 ते 12 जागा | बेसिक पूर्ण केलेल्यांसाठी, 44 विषय |
| 10 आठवड्यांचा वक्ता प्रशिक्षण कोर्स | 10 आठवडे, दर रविवारी | वक्तृत्वाचा पाया पक्का करायचा आहे |
| Complete Public Speaking Mastery Course | 21 आठवडे, दर रविवारी 4 तास (84 तास) | 30 सेकंदांपासून 60 मिनिटांच्या भाषणापर्यंत |
| प्रोफेशनल अँकरिंग मास्टरी कोर्स | 10 आठवडे, प्रत्येक सत्र 4 तास | सूत्रसंचालन शिकायचं आणि त्यातून कमवायचं आहे |
| शिकाल भाषण, तर कराल शासन! Online | 5 दिवस, WhatsApp वर, ₹1,999 | घरबसल्या शिकायचं आहे |
| युवराज गायकवाड वक्ता क्लब | मासिक सदस्यत्व, ऑनलाइन | कोर्सनंतर सराव चालू ठेवायचा आहे |
प्रत्येक कोर्सचा सविस्तर अभ्यासक्रम मुख्य पानावरच्या कोर्सेस विभागात आहे.
कोणता कोर्स निवडायचा?
- पहिल्यांदाच सुरुवात करताय? 1 दिवसीय कार्यशाळा किंवा 3 दिवसीय निवासी बेसिक कार्यशाळा.
- नोकरी किंवा व्यवसायामुळे फक्त रविवार मोकळा? 10 आठवड्यांचा कोर्स किंवा 21 आठवड्यांचा Mastery Course.
- सूत्रसंचालन शिकायचं आहे? 10 आठवड्यांचा प्रोफेशनल अँकरिंग मास्टरी कोर्स.
- पुण्याबाहेर राहता? लोणावळ्याची निवासी कार्यशाळा किंवा WhatsApp वरचा 5 दिवसांचा ऑनलाइन कोर्स.
- मुलांसाठी? 4 ते 10 वयोगटासाठी "आरंभ", 10 ते 20 वयोगटासाठी "भरारी".
क्लासमध्ये प्रत्यक्ष काय होतं?
इथे लेक्चर कमी आणि स्टेजवरचा सराव जास्त असतो. पहिल्या दिवशी 30 सेकंदांची स्वतःची ओळख. मग दर आठवड्याला एक पायरी वर: 1 मिनिट, 2 मिनिटं, 5 मिनिटं, आणि Mastery Course मध्ये 60 मिनिटांपर्यंत.
देहबोली, आवाज, भाषणाची सुरुवात, मध्य आणि शेवट, कथाकथन, व्यासपीठ संबोधन, ऐनवेळी द्यायचे भाषण, या सगळ्याचा प्रत्यक्ष सराव होतो. सहकारी ट्रेनर लहान गटांत सराव घेतात, म्हणून प्रत्येकाला बोलण्याची आणि फीडबॅकची संधी मिळते.
हा अनुभव कशावर आधारित आहे?
विद्यार्थ्यांचे स्वतःचे अनुभव यशोगाथा पानावर व्हिडिओमध्ये पाहा. वृत्तपत्रांतील बातम्या आणि पुरस्कार सन्मान आणि माध्यमं पानावर आहेत.
आगामी बॅचेस (पक्क्या तारखा)
फी, राहण्याची सोय आणि उरलेल्या जागा WhatsApp किंवा फोनवर विचारा: 92208 60406 / 75176 05595.
प्रवेश चौकशी: कोर्सनुसार
ज्या कोर्सबद्दल माहिती हवी आहे, त्याचं बटण दाबा. WhatsApp वर कोर्सचं नाव आधीच लिहिलेला मेसेज उघडेल. फी, पुढच्या बॅचची तारीख आणि जागा उपलब्ध आहेत का, हे टीम लगेच सांगेल.
नेहमीचे प्रश्न
फी किती आहे?
प्रत्येक कोर्सची फी वेगळी आहे आणि बॅचनुसार ऑफर असतात. 92208 60406 वर फोन किंवा WhatsApp करा, पुढच्या बॅचची तारीख आणि फी लगेच सांगितली जाईल. ऑनलाइन WhatsApp कोर्स ₹1,999 चा आहे.
इंग्रजीत शिकवता का?
प्रशिक्षण मराठीत होतं. बोलताना जे इंग्रजी शब्द आपण रोज वापरतो, ते तसेच वापरले जातात. आपल्या भाषेत विचार केला की बोलणं सोपं होतं.
शाळा, कॉलेज किंवा कंपनीत येऊन प्रशिक्षण देता का?
हो. कॉर्पोरेट ट्रेनिंग, शिक्षक प्रशिक्षण, स्मार्ट पॅरेंटिंग, ट्रेन द ट्रेनर आणि Motivational शो होतात. 1,500+ शाळांमध्ये प्रशिक्षण झालं आहे.
क्लासचे दोन्ही अधिकृत नंबर कोणते?
मुख्य नंबर (कॉल आणि WhatsApp): 92208 60406. दुसरा नंबर: 75176 05595.
कोर्स, तारखा आणि फी जाणून घ्यायला एक मेसेज पुरे.